सूचना फलक

विशेष सूचना चाळीतील सर्व रहिवाश्यांना नम्र विनंती करण्यात येते की, सर्वसाधारण सभेमध्ये काही सदस्यांनी सूचन केल्याप्रमाणे, आपआपल्या चाळीतील, माळ्यावरील प्रतिनिधीना बदलायचे असल्यास त्यांनी नवीन प्रतिनिधी निवडून आपआपल्या चाळीतील, माळ्यावरील रहिवाह्यांच्या सह्या घेऊन कमिटीकडे पाठवून द्यावेत ही नम्र विनंती. 1) प्रतिनिधी हा संमत्तीधारक असावा. *विशेष टीप* := दिनांक 05/08/2018 पर्यंत जर प्रतिनिधी बदलला नाहीत तर जे प्रतिनिधी आता आहेत तेच कमिटीत कायम राहतील.

तेजुकाया सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १ जुलै २०१८ रोजी सकाळी ठिक ९.३० वा. डॉ. शिरोडकर हायस्कुल, परेल येथे विकासक प्रणव तेजुकाया यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व रहिवाशांनी वेळेवर उपस्थित रहावे.जर गणसंख्येअभावी सभा तहकुब करण्यात आली तर तीच सभा त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल व त्या सभेस गणसंख्येचे बंधन रहाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. सभेपुढील विषय--- १) मागील इतिवृत्तातास मंजुरी देणे. २) त्रैवार्षिक जमाखर्च अहवालास मंजुरी देणे ३) मागिल वार्षिक कामकाजाचा आढावा घेणे. ४) विकासक प्रणव तेजुकाया यांच्यासोबत पुनर्विकासाबाबत चर्चा करणे. ५) वाढीव पुनर्विकास निधी काढण्यास मंजुरी देणे. ६) अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय. आपला नम्र, ते.स.गृ.सं.(नि.) सुचना- सभेस फक्त संमतीधारकाना प्रवेश देण्यात येईल. विशेष सूचना := सर्व रहिवाशांना कळविण्यात येते की, मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचे मिनिट नोंद व त्रैवार्षिक जमाखर्च अहवाल ( वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकच्या मागे ) पोस्टाने पाठविण्यात आलेला आहे.

तेजुकायातील सर्व रहिवाश्यांना कळविण्यात येते की चाळीचे मालक कांतिलाल तेजुकाया/प्रमोदकुमार तेजुकाया यांच्या सुचनेनुसार रहिवाश्यांकडून मासिक भाडे घेतले जात आहे. माझ्या मतानुसार जरि बिल्डींग तुटली असली तरि आजही चाळमालक तुम्हाला त्यांचे भाडेकरु मानत आहेत हे रहिवाश्यांच्या हिताचे आहे.चाळीचा विकासक म्हणून मी एवढेच सांगेन की खोलीचे भाडे भरावे की न भरावे याचा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.

त्याचप्रमाणे मी आपणास कळवू इच्छितो कि चाळीच्या बांधकाम करण्याविषयी आलेल्या अडचणी दुर करुन यापुर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्यात येईल. आपण आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेऊन मला सहकार्य केलेत. यापुढेही आपला हा विश्वास ठाम राहील आणि आपल्या या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही याची मी ग्वाही देतो. आपला, प्रणव तेजुकाया विकासक -- तेजुकाया काँर्पस्

आपल्या चाळीच्या पुर्नविकासाचा एक टप्पा म्हणून रहिवाश्यांना द्वितीय वर्षाच्या भाड्याच्या चेकवाटपाचे टाईमटेबल आम्ही tejukayamansion.com या वेबसाईटवर आपल्या माहितीसाठी प्रदर्शित करत आहोत. सदर चेकवाटपाची यावर्षीची तारिख हि आपण गतवर्षी आपल्या घराची चावी आमच्या हातात सुपुर्द केलेल्या तारखेच्या ४५ दिवस अगोदरची (म्हणजे १ महिना अधिक १५ दिवस) असणार आहे.

यासंदर्भात आपणास काही शंका किंवा अधिक माहीती हवी असल्यास आपण स्वतः किंवा आपल्या प्रतिनीधींसोबत तेजुकाया काँर्पच्या माटुंगा कार्यालयात श्री. मेकिन संघोई यांच्याशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक रहिवाश्यांनी आपले चेक घेण्यासाठी साईटवर प्रदर्शित केलेल्या आपल्या संबधित दिवशी(रविवार व सुट्टीचे दिवस सोडून) सकाळी १०.३० ते सायं. ७.०० या वेळेत येऊन तेजुकाया काँर्पच्या माटुंगा येथील कार्यालयातून आपल्या घरभाड्याचे चेक घेऊन जावेत. आपल्या माहीतीसाठी तेजुकाया काँर्पच्या आँफिसचा संपर्क क्र. ०२२२४१६७६७६.

आपल्या तेजुकाया मॅन्शनच्या पुनर्विकसित इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम म्हणजे आपण सर्वांच्या दृष्टीने एक आनंददायी क्षण .. पुनर्विकासाच्या मार्गावरील एक महत्वपूर्ण टप्पा . या भूमिपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास आपण तेजुकाया मॅन्शनमधील सर्व रहिवाश्यांनी उपस्थित राहून शोभा आणली आणि पुनर्विकासाच्या पुढील कार्यास आशिर्वाद दिल्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत .

या कार्यक्रमाच्या प्रसंगी काढलेली छायाचित्रे आपणा सर्वांच्या अवलोकनार्थ या ठिकाणी आम्ही ठेवत आहोत . या छायाचित्रांच्या अवलोकनाच्या निमित्ताने आपण सर्वांच्या या आनंददायी सोहळ्याच्या निशिवतच उजाळा मिळेल . सादर छायाचित्रे आपणास स्वतंत्रपणे अथवा एकत्रितपणे डाउनलोड किवा सेव्ह करता येतील . आपला, प्रणव तेजुकाया